स्टोरी

आय.जी. संजय दराडे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद! 

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कोकण क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय दराडे यांचे श्री भराडी देवी मंदिरात आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने स्वागत करत सत्कार करण्यात आला. तसेच २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जत्रोत्सवास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा देखील आंगणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मालवण पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे, मंडळाचे सचिव काका आंगणे, भास्कर आंगणे, बाबू आंगणे, मसुरे बिट अंमलदार प्रमोद नाईक, मालवण पोलीस कैलास ढोले, सीताराम आंगणे, दिनेश आंगणे, नंदू आंगणे, सतीश आंगणे, रामदास आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषदेला नवीमुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

news

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

news

Leave a Comment