स्टोरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने सोमवारी १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सावंतवाडी भटवाडी येथे सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, सकाळी १०:३० वाजता समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर भटवाडीत सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी, विनायक गुरव आदी उपस्थित मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी विविध कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जाधव यानी केले आहे.


Spread the love

Related posts

भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष मसुरे सुपुत्र नंदू दादा परब यांचा मसुरे गावच्या वतीने आज मसुरे येथे नागरी सत्कार..!

news

आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे…! यशवंत शितोळे.

news

वीर वाजेकर महाविद्यालयाचा गौरव ठाकूर याची 10 मीटर रायफल नेमबाजीत चमकदार कामगिरी! राष्ट्रीय स्पर्धेसाठी ठरला पात्र

news

Leave a Comment