स्टोरी

जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव ग्रंथालयात होणार

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्गजिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय यांच्या सहकार्याने येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव वाचनालय येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, प्रमुख पाहुणे  मच्छ व बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सरपंच मनिषा भोसले, पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सगुण धुरी आधी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८:३० वाजता प्रतिनिधी नोंदणी परिचय, अल्पोहार, सकाळी ९:३० वाजता ग्रंथदिंडी, सकाळी १०:३० वाजता अधिवेशन उद्घाटन सोहळा, दुपारी १:३० वाजता भोजन, दुसऱ्या सत्रात दुपारी २:३० वाजता खुले अधिवेशन आणि सायंकाळी पाच वाजता समारोप असा कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव राजन पांचाळ व माणगाव वाचनालय अध्यक्ष सौ स्नेहा फणसळकर यांनी केले आहे


Spread the love

Related posts

आरे देवीचीवाडी केंद्रशाळा देवगड तालुक्यात द्वितीय…!

news

शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

news

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला वापरता येणार नाही घड्याळ चिन्ह!

news

Leave a Comment