शिक्षण

पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे.

Spread the love

२३ डिसेंबर वार्ता: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे. मात्र पुन्हा अनुतीर्ण झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.


Spread the love

Related posts

मराठी शाळांची बंद होणारी खोटी आकडेवारी पसरवणं थांबवा..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रसाद परब

अ.भा. गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल २०२३ च्या संगीत परिक्षेत ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश!

news

सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीचा मानकरी

news

Leave a Comment