स्टोरी

मुणगे शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता! घुमट वादन ठरले विशेष आकर्षण

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात शिमगोत्सवाची सांगतादेवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शुक्रवारी सायंकाळी झाली. मुणगे भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सवाला होळी उत्सवाने सोमवारी सुरुवात झाली. सोमवारी दुपारी बांबरवाडी येथून होळी साठी पोपळीचे झाड देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच बारापाच मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आणण्यात आले.

मुणगे शिमगोत्सव

सायंकाळी वाजतगाजत होळी उभारण्यात आली. गुरव यांच्याकडून होळीची विधीवत पूजा झाल्यानंतर आकार ठेवणे, नैवेद्य, गावघराचे गाऱ्हाणे, नारळ ठेवणे, गावकरांमार्फत गाऱ्हाणे घालून शिमगोत्सवाची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ७ मार्च रोजी रात्री भगवती मंदिर व होळीजवळ पारंपरिक पद्धतीने कारिवणेवाडी, बांबरवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी या मंडळांची खेळ व नाचगाणी, होळीजवळ कवळ पेटविणे, भगवती मंदिरात बांबरवाडी मंडळाचा तमाशा, तर तिसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी गावांमध्ये खेळे खेळण्यास सुरुवात झाली.

चौथ्या दिवशी ९ मार्च रोजी रात्री होळीजवळ व भगवती मंदिरात रोंबाट खेळ व नाचगाणी, तर पाचव्या दिवशी १० मार्च रोजी दुपारी भगवती मंदिरात बांबरवाडी यांचा तमाशा, सर्व मंडळांची पारंपरिक रोंबाट खेळ, होळीजवळ रोंबाट, नवसफेड व नवीन नवस गाऱ्हाणी, भगवती मंदिरात रोंबाट, देवीच्या सभा मंडपात नाचगाणी, देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. सांगता कार्यक्रम प्रसंगी घुमट वादन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.


Spread the love

Related posts

रशियाने पश्चिम युक्रेन शहरावर क्रूझ क्षेपणात्रांचा हल्ला!

news

इर्षाळवाडी दुर्घटना ग्रस्त व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

news

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment