स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक! 

Spread the love

सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव – राज ठाकरे 

महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचेही केला विशेष गौरव

अक्कलकोट प्रतिनिधी:  श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतीच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांची स्वामी भक्ती नेहमीच आपण करीत आलेलो आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने माझी व माझ्या कुटुंबीयांची जीवन वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झालेली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश इंगळे व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे, सचिन मोरे, तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, राम मातोळे, नागेश कुंभार, बाबू वागस्कर, प्रशांत गिड्डे, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, श्रीकांत पाटील, देवेंद्र शिंदे, तम्मा आळवेकर, आदर्श अंकलगी, समर्थ नरगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, ए.पी.आय.बागव, पी.एस.आय.खापरे, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, खाजप्पा झंपले, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, जयप्रकाश तोळणूरे, विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली!

news

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेत 144 कोटींचा घोटाळा,-स्मृती इराणींनी दिले चौकशीचे आदेश

news

पायाची शस्त्रक्रिया केलेल्या भोईचे केरवडे येथील नागरिकाला आमदार वैभव नाईक यांनी औषधोपचारासाठी केली आर्थिक मदत

news

Leave a Comment