स्टोरी

व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा.

Spread the love

भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची मागणी

 

मालवण प्रतिनिधी : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा. मच्छीमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या विषयात लक्ष वेधण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली.

 

पत्रकात म्हटले आहे की, दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयितांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची १९ किलो उलटी संशयितांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली आहे. अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. तसेच तपासा दरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याचे वृत्त हाती आली आहे. संबंधित विषयात पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेलने घेतली आहे. मच्छिमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नसल्याचा इशाराही तोरसकर यांनी दिला आहे.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संदीप देसाई!

news

दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणे कुटुंबीयांकडून आंगणेवाडीत सत्कार..!

news

पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाने केला राजद्रोह’चा कायदा रद्द

news

Leave a Comment