शिक्षण

एल. एल. बी. (LLB 5 years) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या अर्ज भरण्याची मुदतीत वाढ…!

Spread the love

२३ फेब्रुवारी वार्ता: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) पाच वर्षे एल. एल. बी. (LLB 5 years) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सीईटी सेलकडून यापूर्वी मुदत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा उमेदवार आणि पालकांच्या विनंतीचा मान ठेवून एक महिन्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. आता विद्यार्थी 20224-25 या वर्षांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या लॉ सीईटीसाठी येत्या १८ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

 

मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मसी अभ्यासक्रमांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संखेत वाढ होत आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेल कडे मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. विद्यार्थी हिताचा विचार करून सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती (Detail information) परीक्षा कक्षेच्या अधिकृत संकेतस्थळ (Official website) https://www.mahacet,org वर उपलब्ध आहे.

 

सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

आर.पी. बागवे हायस्कूल मसुरे येथे ६ जुलै रोजी जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ!

news

भरतगड इंग्लिश मिडीयम येथे महिला दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

दांडी शाळेतील सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

news

Leave a Comment