स्टोरी

श्री. विष्णु गंगाराम माणगावकर सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्कारांने सन्मानित….!

Spread the love

सिंधुदुर्ग: जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन्स व सिंधु सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा कुडाळ येथे संपन्न झाला. या सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते मान. श्री. विश्वजीत फडके गोवा, जोतिबाच्या नावाने चांगभले, स्वराज्य रक्षक संभाजी, जय मल्हार, गरुड झेप, फेम यांच्या शुभहस्ते तसेच  मान. श्रीम. राजश्री काळे सिने अभिनेत्री. चित्रपट _लढा शिक्षणाचा, पारड, मालिका _चार दिवस सासूचे, मन उधाण वार्‍याचे, या सुखानु या फेम मान. श्री. विजय मानावतकर , सुप्रसिद्ध खलनायक तसेच सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे क्षेत्रपाल श्री देव वेतोबा फेम श्रीमती. नम्रता गावकर सुप्रसिद्ध अभिनेत्री, मान. महेश कुंटे कायदेविषयक सल्लागार, मान श्री. देव सर, संस्थापक अध्यक्ष श्री. दीप स्तंभ शैक्षणिक संस्था कोल्हापूर, आणि मान. प्रा. बी. एन. खरात संस्थापक अध्यक्ष, ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन्स कंपनी यांची प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री. विष्णु गंगाराम माणगावकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय, कला, क्रिडा, दशावतार, पर्यटन अश्या विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवरत्न मधील एक रत्न म्हणुन सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यापुर्वी ही विष्णु माणगावकर यांना राज्यस्तरीय युवा चित्रकार पुरस्कार २०१४, कलाश्री पुरस्कार २०१७, राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार २०१७, सांस्कृतिक साहित्य पुरस्कार २०१७, महाराष्ट्र कला शिव सन्मान २०२३, महाराष्ट्र कलारत्न गौरव पुरस्कार २०२३, उत्कृष्ट कला शिक्षक पुरस्कार २०२३  ईत्यादी पुरस्कार देण्यात आले.  श्री. विष्णु माणगावकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव; समितीवर शासनातर्फे सदस्य तथा एनजीओ म्हणून रवी जाधव व पत्रकार विनायक गावस यांची सदस्य पदी निवड

प्रसाद परब

२ मे रोजी नैरोबी केनिया येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.

प्रसाद परब

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

news

Leave a Comment