क्राईम

बिबवणे बॉक्सवेल तेथे गोवा बनावटीच्या दारूसह २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Spread the love

कुडाळ पोलिसांची कारवाई….

कुडाळ: अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कुडाळ पोलीसांनी मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे बॉक्सवेल येथे कारवाई करत २ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई कुडाळ पोलिसांनी मंगळवारी रात्री १. वा केली.

बिबवणे बॉक्स वेल येथे एका अल्टो कारने गोवा बनावट दारूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. यावेळी सापळा रचत संशयित संतोष पांडुरंग देऊलकर यांच्या गाडीची तपासणी केली. यावेळी या गाडीमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. मंगळवारी रात्री १ वा च्या सुमारास ही कारवाई कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा परुळेकर, होमगार्ड कृष्णा गावडे महेश गोलतकर यांनी केली. या घटनेची फिर्याद पोलीस नाईक स्वप्निल तांबे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. तर संशयित आरोपी संतोष पांडुरंग देऊलकर याला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.या कारवाईत २ लाखांची कार व ४५ हजाराची दारू असा २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल कुडाळ पोलिसांनी जप्त केला आहे.


Spread the love

Related posts

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले! मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त….

news

कत्तल खान्यात घेऊन जाणाऱ्या ५ गायीची गोराक्षांकाकडून सुटका..

news

राष्ट्रीय तपास यंत्रणेची जबलपूर येथे छापेमारी!

news

Leave a Comment