स्टोरी

मानवता विकास परिषद च्या कार्यास दत्ता सामंत यांचा पाठिंबा..

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर)

 

मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच मसूरे येथे भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले. तसेच खेड्यांचा विकास म्हणजेच सर्वांगीण विकासाचा पाया याबाबत श्रीकांत सावंत यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शन करताना लक्ष वेधले. यावेळी दत्ता सामंत यांनीही श्रीकांत सावंत यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले. तसेच मानवता विकास परिषद च्या कार्यास संपूर्णपणे पाठिंबा व्यक्त केला.

या भेटीदरम्यान मानवता विकास परिषद वतीने उद्योजक दत्ता सामान्य यांचा समर्थ सद्गुरु पाचलेगावकर महाराज यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक मालवण नगर पालिका दीपक पाटकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, सोमाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर आणि मानवता विकास परिषद कार्यकर्ते उपस्थित होते.

 

फोटो:

उद्योजक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करताना श्रीकांत सावंत..

छाया: दत्तप्रसाद पेडणेकर, मसुरे..


Spread the love

Related posts

इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक मोदी सरकारच्या महत्वाच्या सूचना जारी

news

शिंदे फडणवीस सरकारद्वारा वीज बिलामध्ये वाढ

news

हवेतून जाणाऱ्या आमदारांना रस्त्यावरील गोष्टी लहान लहानच दिसणार…! आमदार केसरकरांवर सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांची खोचक टिका.

news

Leave a Comment