स्टोरी

कसे अडकले सूरज आणि सागर ?…..

Spread the love

सावंतवाडी:  सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या लाच प्रकरणातील काही धक्कादायक खुलासे आता बाहेर येऊ लागले आहेत. घटना घडली त्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे पोलीस ठाण्यात होते. त्यांना पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील याने फोन करून वस्तू ताब्यात घ्या असे सांगितले. त्यामुळेच खंडागळे याने पैसे घेतले आणि ते पैसे गोणपाटात लपवून ठेवले होते. ते नंतर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आरोपीवर कारवाई करताना रायगड लाच लुचपत विभागाचे अधिकारी

तक्रारदार सिद्धांत परब याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांने उच्च न्यायालयात जात या प्रकरणात जामिन घेतला होता. मात्र त्यानंतर ही पोलिसांकडून सिद्धांत परब याला त्रास होत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, या काळात तक्रारदार सिद्धांत परब आणि पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याच्यात एका हॉटेलात सतत बैठका होत होत्या. या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा तक्रारदार सिद्धांत परब यांना तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला गुन्ह्यातून बाहेर काढतो असे सांगत होता. तर त्याची शेवटची बैठक बुधवारी रात्री माजगाव येथे कारमध्ये झाली होती. ही बैठक होण्यामागे तक्रारदार याला विश्वास पटावा म्हणून खुद्द पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यानेच त्याला फोन करून बोलावून घेत तपास अधिकाऱ्यांसमोर बसवले. या तिघामध्ये चर्चा झाल्यानंतर तक्रारदारास विश्वास पटला आणि त्याने आपण ठरल्याप्रमाणे पैसे आणून देतो असे सांगून तक्रारदार तेथून निघून गेला. त्यानंतर घटनेच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत होता. याची कल्पना तक्रारदार सिद्धांत परब याला नव्हती. सिद्धांत परब याने पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याला फोन केला आणि आपण सांगितल्या प्रमाणे पैसे आणले आहेत असे सांगितले. पैसे कोणाकडे द्यायचे? असं विचारल्यावर मी बाहेर आहे साहेबांकडे द्या असे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटी पाटील याने खंडागळे याला फोन करून सांगितले की सिद्धांत परब वस्तू घेऊन आला आहे ती ताब्यात घ्या. त्याप्रमाणे तक्रारदार कडून खंडागळे याने पैसे ताब्यात घेतले आणि तेथेच लाचलुचपतचे काम सोपे झाले.

तक्रारदार सिद्धांत परब याने एवढी मोठी रक्कम दिली ती कुठे ठेवायची? म्हणत खंडागळे याने ते पैसे गोणपाटात दडवून ठेवले. त्याचवेळी रायगड लाचलुचपत विभागाच्या पथकांने त्याच्यावर धाड टाकली. बराच उशिर पैसे सापडत नव्हते म्हणून लाचलुचपत ने खंडागळे याच्या हाताला पावडर लागली का ? याची तपासणी केली असता पावडर लागली आहे. म्हणून आजूबाजूला तपासणी केली तेव्हा गोणपाटात पैसे सापडले. आणि सर्व गुढ उलगडले.


Spread the love

Related posts

मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या सिंधुदूर्ग विकास प्रश्न दौऱ्यास प्रारंभ.

news

आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करा..! – प्रा. रुपेश पाटील.

news

श्री हनुमान जयंती उत्सव नरेंद्र डोंगर, जुनाबाजार, सावंतवाडी

news

Leave a Comment