स्टोरी

ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड

Spread the love

देऊळवाडा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा केला सत्कार

 

 

सिंधुदुर्ग: ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी उमेश डिचवलकर हिची निवड झाली आहे.त्याबद्दल मालवण देऊळवाडा तेलीवाडी येथील महापुरुष मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. तसेच चंदना दिनेश डिचवलकर हिने दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, मनोज मोंडकर, सुहास वालावलकर, उमेश चव्हाण, केदार वालावलकर, नितीन बांदेकर, सदानंद डिचवलकर, अमित डिचवलकर, नीतिन बांदेकर, योगेश वालावलकर, कुणाल वालावलकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

छत्रपती संभाजीनगर येथे ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेमुळे खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रम सोडून गेले !

news

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग! ब्युटीज ऑन व्हील्स कडून अभिनंदन

news

गोष्ट एका गावाची! आढावा सरकारच्या कामाचा आणि माहिती विकासाची!

news

Leave a Comment