स्टोरी

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

Spread the love

मालवण: मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले.हे कुटुंब गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत विचारपूस करून आर्थिक मदत केली व मांजरेकर कुटुंबियांना धीर दिला. मांजरेकर कुटूंबियांना सर्व शिवसैनिकांच्या वतीने देखील पैसे गोळा करून अधिकची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, मसुरा विभाग प्रमुख पिंट्या गावकर, शाखा प्रमुख मधुकर परब, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, राहुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, सौ. गावकर, स्वप्नील मुणगेकर, चंद्रकांत परब, अनिल परब, रंजन प्रभु,माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, योगेश मेस्त्री, संजय राणे, अश्विनी बांदकर, आपा परब, बबलु मिठबावकर, मया हडकर, विकास आचरेकर, आयवाण फर्नांडिस आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार ! – मा. श्री. मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री*

news

ओटवणे येथील प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० वा पुण्यतिथी उत्सव गुरूवारी उत्साहात संपन्न

news

२ मे रोजी नैरोबी केनिया येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.

प्रसाद परब

Leave a Comment