स्टोरी

शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिरे वाचवली, आपल्याला पुण्येश्‍वराचे मंदिर वाचवायचे आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

Spread the love

पुणे: बांधकाम करण्यास अनुमती नसतांनाही पुण्येश्‍वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. अतिक्रमण करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आम्ही वीटही काढणार नाही; पण तुम्ही काढली नाही, तर यापुढे महापालिकेला पत्र पाठवून विनंती केली जाणार नाही. आम्ही हे अतिक्रमण पाडण्याचा दिनांक घोषित करू.छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कह्यातून अनेक मंदिरे वाचवली आहेत. आता आपल्याला पुण्येश्‍वराचे मंदिर वाचवायचे आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडून टाकावे. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. ४ सप्टेंबर या दिवशी ‘पुण्येश्‍वर निर्माण समिती’च्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलेे. या वेळी भाजपचे आमदार महेश लांडगे, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, मिलिंद एकबोटे आदी सहभागी झाले होते.या वेळी उपस्थित भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले की, धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.

महापालिका कर्मचार्‍यांकडून निषेध!

आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून ५ सप्टेंबर या दिवशी पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.


Spread the love

Related posts

महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!

news

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी!

news

मालवण तालुक्यातील २ कोटी ८६ लाखाच्या कामांचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…!

news

Leave a Comment