स्टोरी

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न!

Spread the love

मुलांना जगावर प्रेम करायला शिकवा! अॅड श्रीपती शिंदे….

मसुरे प्रतिनिधी:

 

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत प्रा मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव जन्मशताब्दी निमित्त आयोजितचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार श्रीपती शिंदे यांच्या हस्ते कट्टा येथे झाला. मुलाना जगावर प्रेम करायला शिकवा. उपजत कलाना चांगले मार्गदर्शन उपलब्ध करून ध्या. असे यावेळी माजी आमदार श्रीपती शिंदे म्हणाले.

साथी सुरेश शिपुरकर यानी सेवांगण च्या उपक्रमांचे कौतुक केले. वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे समतेचा विचार पसरवण्याचे कार्य सेवांगण करत आहे. याचा फार आनंद होतो असे प्रतिपादन त्यानी केले.

अपना बाजारचे जगदिश नलावडे यानी प्रा. मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव यांच्या कार्याची ओळख करून दिली. या पुढेही अनेक कार्यक्रम संयुक्तपणे आखले जातील याची ग्वाही दिली. देवरुखचे युयुत्सु आर्ते यानी मुलांमधील रुजुता जीवंत ठेवा व त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला करियर करू द्या असे आवाहन शिक्षक व पालकांना केले.प्रारंभी किशोर शिरोडकर व लक्ष्मीकांत खोबरेकर यानी सेवांगणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इचलकरंजीचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यानी संपादित केलेले प्रा मधु दंडवते यांच्या चरित्रा वर आधारीत ध्यासपर्व या पुस्तकाचे अँड. श्रीपती शिंदे व मान्यवरांचे हस्तेप्रकाशन करण्यात आले.

या चित्रकला स्पधेला ४५ शाळातील ११०० विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील ११० गुणवंत विद्यार्थ्याना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तिपत्रके व शालेय वस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम ३ विद्यार्थी श्रेया समीर चांदरकर, ममता आंगचेकर, रिया भगत यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमिताने दीपक भोगटे यानी काढलेले अॅड श्रीपती शिंदे यांचे स्केच शिंदेना देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळकृष्ण नांदोसकर यानी केले.या कार्यक्रमास बापू तळावडेकर, उषा वेंगुलेकर, सिंधू नलावडे, दीपक भोगटे, मयेकर मॅडम, बबलू प्रभुगावकर, सौ प्रभुगावकर, भोगले सर, शिक्षकपालक विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया…! – ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

news

आवळेगांव देव नारायणाचा जत्रोत्सव रविवार २ नोव्हेंबर रोजी.

news

डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार

news

Leave a Comment