स्टोरी

रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प!

Spread the love

मालवण (मसुरे) प्रतिनिधी:

 

मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य रस्त्यावर पन्हळकरवाडी येथे रविवारी सायंकाळी झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कट्टा आंगणेवाडी बस सुद्धा काहीकाळ तेथेच थांबून राहिली होती. याबाबत माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी तेथे धाव घेत स्थानिक कार्यकर्ते नीलेश लाड, गणेश सांडव, दिनकर चव्हाण, किशोर बागवे, चंद्रकांत परब यांच्या मदतीने झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. याबद्दल वाहन धारक आणि प्रवाशांनी महेश बागवे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

news

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

news

कुसगाव कुडाळ येथील आजारी असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

news

Leave a Comment