स्टोरी

कुसगाव कुडाळ येथील आजारी असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

Spread the love

कुडाळ: कुसगाव कुडाळ येथील आजारी असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीने दिल जीवदान दिले आहे. अधिक माहिती अशी की, गेले दोन दिवस सावंतवाडी, भटवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरा समोर कुसगाव येथील निराधार वृद्ध जाधव आजारी अवस्थेत पडलेले होते. या निराधार वृद्ध व्यक्तीची माहिती सामाजिक बांधिलकीला मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शामराव हळदणकर व सुजय सावंत यांनी तेथे धाव घेतली व सदर वृद्ध व्यक्तीला कोरगावकर यांच्या ॲम्बुलन्स मध्ये घालून पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये अ‍ॅडमिट करून त्याचा जीव वाचवला.

यासाठी सावंतवाडीचे पोलीस पी.के कदम, संतोष गलोले व कोरगावकर यांचे सहकार्य लाभले. सदर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरी कुसगाव येथे सोडण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीने घेतली आहे.


Spread the love

Related posts

आग्रहाचे निमंत्रण…! उद्या सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने होणाऱ्या दहावी पास विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहा…! सिताराम गावडे.

news

युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये जगभरात ७ कोटी लोक विस्थापित! ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्र ‘स्वित्झर्लंड’….

news

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात

news

Leave a Comment