स्टोरी

अभिनेता अक्षय कुमार यांच्या थोबाडीत मारणार्‍याला १० लाख रुपये बक्षीस देऊ ! – हिंदु संघटना

Spread the love

१५ ऑगस्ट वार्ता:‘ओ माय गॉड’ या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटातील भगवान शिवाविषयीच्या अवमानकारक दृश्यांमुळे उत्तरप्रदेशातील आगरा येथील ‘राष्ट्रीय हिंदु परिषद’ ही संघटना संतापली आहे. ‘जी व्यक्ती या चित्रपटातील अभिनेते अक्षय कुमार यांच्या थोबाडीत मारेल, त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल’, असे आवाहन या संघटनेने केले आहे.

१. या चित्रपटात अक्षय कुमार यांचे वर्णन ‘भगवान महादेवाचा दूत’ म्हणून केला आहे. तो बूट घालून उभा रहातो, खाद्यपदार्थ विकत घेतो, तलावाच्या घाणेरड्या पाण्यात अंघोळ करतो. यामुळे हिंदूंच्या देवतंची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप या संघटनेने केला आहे.

२. राष्ट्रीय हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला. हा चित्रपट प्रदर्शित करणार्‍या चित्रपटगृहांसमोर आंदोलन करण्याची चेतावणीही हिंदु संघटनेने दिली आहे.


Spread the love

Related posts

सर्व अधिकार ग्राहकांना माहीत असल्यास ग्राहक सजग बनेल l…! तहसीलदार दिक्षांत देशपांडे

news

मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर

news

सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आठ फुटी भव्य पणती पेटवून श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त आनंदोत्सव साजरा…!

news

Leave a Comment