क्राईम

मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणार्‍या आतंकवाद्यांकडे आढळली चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे!

Spread the love

३१ जुलै वार्ता: मागील काही मासांपासून मणीपूरमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार चालू आहे. हा हिंसाचार करणार्‍या आतंकवाद्यांकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे ही चिनी बनावटीची आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणारे बहुतांश आतंकवादी हे बंदुका आणि रायफली यांचा वापर करत आहेत. चीन-म्यानमार सीमारेषेवर शस्त्रास्त्रांचा काळा बाजार भरतो. येथून ही शस्त्रास्त्रे म्यानमार सीमेवर आणून तेथून मणीपूर राज्यात पाठवली जातात,भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणार्‍या आतंकवादी संघटनांना चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे पुरवली जातात. मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणार्‍या अनेक आतंकवादी संघटनांचे प्रमुख हे चीनमध्ये लपून बसल्याची माहितीही समोर आली आहे.


Spread the love

Related posts

ठाणे विभागात साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे!

news

खारघर सीएमसी सलूनमध्ये हेअर स्पादरम्यान विनयभंग; आरोपी ताब्यात

प्रसाद परब

उबाठा पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांची हत्या.

newss

Leave a Comment