स्टोरी

नटवाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना जाहिर

Spread the love

बांदा : नटवाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना आज १४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना, हा सत्कार म्हणजे माझ्यावरील प्रेमाची पावती असून, मी अनेक पुरस्कार स्वीकारले मात्र, हा सत्कार स्वीकारताना आपण भावूक झाल्याचं डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितलं.यावेळी व्यासपिठावर एस. आर. सावंत, अध्यक्ष नट वाचनालय बांदा, सचिव, राकेश केसरकर, अन्वर खान, अध्यक्ष – ज्येष्ठ नागरिक संघ, प्रकाश पाणदरे, डॉ. रुपेश पाटकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक – निलेश मोरजकर, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्नीता सावंत,  नेरुरकर यांच्या भगिनी पुष्पा वालावलकर आदि उपस्थित होते.पेशाने मनोविकारतज्ज्ञ असलेले डॉ. पाटकर हे गेली सुमार वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिलेले आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीना मोफत उपचार देण्यासोबतच पर्यावरण रक्षण, कामगारांचे प्रश्न, कुमारवयीन मुलांच्या समस्या याबाबत भरीव योगदान देत आहेत.त्यांनी बाजारू लैंगिक शोषणाचे पीडितासाठी काम करणार्‍या ‘अन्याय रहित झिंदगी’ या संस्थेसोबत काम केलेले आहे.सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते सातत्याने लिखाण करत असून त्यांची ” माझ्या आईची गोष्ट, एका शिकारीची गोष्ट, ओपन युवर हार्ट, मद्यपाश एक आजार, कुमारांशी संवाद, पर्यावरणीय बुद्धिमत्ता, अर्ज मधील दिवस, भारतीय तत्त्वज्ञानाची गोष्ट, शोध आबे फारीयाचा, शोध धर्मानंदांचा, मनोवेदनांच्या गोष्टी ” वगैरे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.


Spread the love

Related posts

आंबोलीत श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण

news

भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील मुलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा..! रवींद्र मडगावकर यांचे आवाहन.

news

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन ! शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

news

Leave a Comment