राजकारण

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्वपूर्ण माहिती

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्वपूर्ण माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

वकील सिद्धार्थ शिंदे

काय म्हणाले वकील सिद्धार्थ शिंदे?….उद्या निकाल येणार असेल तर आज संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान समजेल. परवा निकाल येणार असेल तर उद्या समजेल. एक शक्यता अशी आहे की, घटनापीठातील एक न्यायाधीश येत्या १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे एखादा न्यायाधीश निवृत्त होत असतो तेव्हा त्याच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी जजमेंट होत नाही. सोमवारी न्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्यामुळे गुरुवार किंवा शुक्रवारी निर्णय येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली आणि केंद्र सरकारच्या संघर्षाचा निकालही बाकी आहे. दिल्ली आणि केंद्र सरकारचं प्रकरण संपलं होतं १६ जानेवारीला. आपलं प्रकरण संपलं 16 मार्चला. तो पण पेंडिंग आहे, असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

जस्टिस शाह हे १५ तारखेला निवृत्त होतील. त्यानंतर १९ मे ते ३ जुलैपर्यंत कोर्टाला सुट्ट्या आहेत. त्यानंतर जस्टीस मुरारी ८ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल आला नाही आणि हे दोन निवृत्त झाले तर घटनापीठात आणखी दोन जजचा समावेश होईल. त्यानंतर पुन्हा रिहिअरिंग होईल आणि या प्रकरणाचा निकाल लांबेल, अशी शक्यताही शिंदे यांनी वर्तवली.

जस्टिस अहमदी यांचं निधन झालं आहे. त्यामुळे निकालापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. उद्या निकाल असेल तर तो १०:३० ऐवजी ११:३० वाजता येईल. जजमेंटमध्ये मेजॉरीटी असेल तर ज्यांनी जजमेंट लिहिली तो एकच जज त्याचं वाचन करेल. जजमेंट खूप मोठी असते. त्याचा मेनपार्ट वाचून दाखवतात. बाकीचे ते सह्या करतात. त्यात दुमत असेल तर ते जज आपलं म्हणणं ऑपरेटिव्ह पार्टमध्ये वाचतात. एकच जजमेंट असेल तर समजायचं एकमत आहे. दोन जजमेंट असेल तर समजायचे दुमत आहे. पाचजणांमध्ये एकमत झालं नाही तर ३ विरुद्ध २ असा निकाल लागेल. मेजॉरिटी जे म्हणतं तेच ग्राह्य धरलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट….

news

काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही! दिग्विजय सिंह

news

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरा जावे! प्रागतिक पक्षांच्या संयुक्त बैठकीत प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे मुंबई येथे आवाहन.

news

Leave a Comment