राजकारण

बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले!-निलेश राणेंचा गौप्यस्फोट

Spread the love

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:– ज्यांच्या जमिनी बारसूमध्ये नाहीत, जे कोकणातील नाहीत अशा व्यक्ती बारसू परिसरात फिरताना दिसून येत आहेत. या माणसांनी जिलेटिन स्टिकसारखी स्फोटक साहित्य बारसूमध्ये आणल्याचे सांगत ६ मे रोजी येथे होत असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.निलेश राणे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून वाद प्रतिवाद होत आहेत. मात्र, त्याचा अनुचित फायदा घेण्यासाठी काही माणसे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. ६ मे रोजी बारसूमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी असणार आहे. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काही तरी अनुचित घटना घडविण्याच्या त्या व्यक्तींचा मानस आहे. असे स्फोटक साहित्य आणण्यामागे कोणता कट आहे का, याबाबत पोलिस यंत्रणेने तपास करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे…तर आम्हीही समर्थनार्थ मोर्चा काढूबारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेऊन विरोध करणार असतील तर आम्हीही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढू, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी

news

साई रिसॉर्ट प्रकरणावरून सुषमा अंधारे यांची किरीट सोमय्या यांच्यावर टीका!

news

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा माजी खासदार निलेश राणेंवर हल्लाबोल…!

news

Leave a Comment