स्टोरी

महापालिकेच्या “९/आय” प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली, ढोकली गाव येथील सुरू असलेल्या अनधिकृत चाळीच्या (१३ रुम), ३ टपऱ्या आणि ८ जोत्यांवर (फाउंडेशन) निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबी व ५ कामगार यांच्या साहाय्याने करण्यात आली.


Spread the love

Related posts

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात पाच दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन.

news

सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे होणार आगमन.

news

कणकवली येथे कै. श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन साजरा

news

Leave a Comment