स्टोरी

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात ११ जवान शहीद

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात ११ जवान शहीद झाले आहेत. या शहीद झालेल्यांमध्ये १० डीआरजीजवान आणि तर एक चालक आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. आज दंतेवाडा येथील अरनपूर भागात नक्षलवादी लपल्याची बातमी मिळाली होती. या माहितीवरून दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी आयडीचा स्फोट केला.


Spread the love

Related posts

कोलगाव चर्चाजवळ झालेल्या अपघातात २४ वर्षीय दिनेश सिंग गंभीर जखमी.

news

कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातातून साकारलेली नऊ बाय सहा फूट आकाराची श्री राम प्रभूंची रांगोळी…!

news

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलचा महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम.

news

Leave a Comment