सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले गावाचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा अशी एकी आणि एकजूट आहे. या गावातील फौजदार वाडी आणि लिंगवतवाडी या दोन्ही वाड्यातील तरुणांपासून महिला वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी एकत्र येत अनेक समाज उपयोगी अशी कामे स्वनिधीतुन उभारली आहेत. बस स्टॉप उभारून त्यांनी एकतेचे प्रतीक दाखवून दिले आहे. अशा शब्दात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले वेर्ले फौजदार वाडी लिंगवतवाडी येथे बस स्टॉप थांबा जवळपास एक लाख रुपयांची देणगी व लोकांच्या मदतीच्या माध्यमातून लोकसहभागातून उभारण्यात आली आहे या बस स्टॉप चा लोकापर्ण सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संवाद तरुण भारत चे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत, सरपंच रुचिता राऊळ, ग्रामपंचायत सदस्य तथा बस स्टॉप उभारणी पुढाकार घेतलेले बाळू गावडे वेले:गोविंद उर्फ दादा लिंगवत, लाडजी राऊळ,सोमनाथ राऊळ,माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ,श्रीमती. लक्ष्मि विश्राम राऊळ,अनिल लिगवत,विश्राम लिगवत, डॉ संजिव लिगवत, डॉ. सौ लिंगवत सतीश लिगवत, ग्रामपंचायत सदस्य चद्रकला गोसावी, ममता राऊळ, वेर्ले सोसायटी चेअरमन श्री. विजय राऊळ,विठ्ठल राऊळ, बापू राऊळ तलाठी प्रवीण फोले प्रमोद नाईक, पाडुरंग राऊळ, सूरेश गावडे, तुकाराम गावडे, भानूदास सावंत, अशोक राऊळ, महादेव मोरजकर, श्रीधर राऊळ, झीलू राऊळ तलाठी प्रवीण फोले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी या बस स्टॉप साठी जमीन उपलब्ध करून देणारे श्रीमती द्वारका लिंगवत व श्री विश्राम लिंगवत या दोन्ही जमीन धारक दानशूर व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर तहसीलदार श्रीधर पाटील व ॲड संतोष सावंत गोविंद लिंगवत लाडजी राऊळ बाळू गावडे सरपंच रुचिता राऊळ आदींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे. या गावात मोठ्या संख्येनेजवळपास साडेसोळा हजार व्यक्ती आहेत तसेच या भागात आतापर्यंत 73 हेक्टर भागातील शेती पंचनामे झाले आहेत ‘या गावातील लोकांनी रस्त्यासाठी तसेच विविध कामांसाठी लोकसहभागातून उभारणी केली आहे शासनाच्या निधीची वाट न बघता आपण लोकसहभाग व एकोपा यातून खूप काही करता येते गावकरील ते राव करील का हे त्यांनी दाखवून दिले आहे हा गाव निसर्गरम्य आदर्श गाव आहे ा गावातील लोकांनी बंधार्यांचे कामही उत्कृष्ट केले आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले यावेळी ॲड संतोष सावंत यांनी या गावाचा आदर्श एकोपा आणि एकसंघ पणाचा आहे या गावाने दारूबंदी असो किंवा रस्ते पाणी वीज त्याचबरोबर सामाजिक उपक्रम ते आध्यात्मिक समाज हिताचे उपक्रम एकजुटीने राबवत आहेत दशक्रोशीत हा गाव इच्छिताच एकोप्यासाठी प्रसिद्ध गाव आहे या गावाने अशीच एकी कायम ठेवावी असे ते म्हणाले यावेळी प्रास्ताविक डॉ संजीव लिंगवत यांनी केले तर सूत्रसंचालन श्री गोसावी यांनी केले यावेळी .श्रीमती.सूहासिनी राऊळ, श्रीमती.देवकी वासूदेव राऊळ, महेश राऊळ, अनिल केसरकल, गोपाळ घोगळे,पार्वती घोगळे, बुधाजी घोगळे, अनिल गावडे, दिलीप घोगळे, न्हानू बांदेकर, ज्ञानेश्वर गावडेसौ वैष्णवी सतीश लिंगवत , श्रीमती. सुभद्रा राऊळ, गुणाजी राऊळ, मोहन राऊळ, सहदेव राऊळ, सूरेखा राऊळ, सूनिता राऊळ, रामचंद्र सावंत, ईदिरा खानोलकर, सत्यवान राऊळ, सूनीता राऊळ, संजय भगवान राऊळ, रामकृष्ण राऊळ, शाताराम राऊळ, प्रकाश मोरजकर, पीडजी राऊळ, नारायण राऊळ, सत्यवान सावंत,वसंत मोरजकर, श्रीमती. यशोदा साटम, सूनिल राघो राऊळ, शशिकांत घाडी, वसंत राऊळ, शाताराम राऊळ, संजय घाडी, यश घाडी, राकेश घाडी, सतिश विठ्ठल लिगलत, विलास लिंगवत, सूनील गावडे महैश लिगवत, संतोष लिगवत, जानदेव लिगवत, बाळू गोसावी, मधुकर लिगवत, शिवराम लिगवत, अनिकेत लिगवत, विजय गोसावी, प्राज्योत गोसावी, भरत गोसावी, आत्माराम गोसावी, राम लिगवत, बाळू गावडे अर्जुन मोरजकर आधी मस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री पाटील यांनी फार्मर आयडी तसेच पीक यादी सामायिक जमीन संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
