सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील ग्रामदैवत श्री लिंगेश्वर देवस्थान मंदिराला विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट दिली शंभर टक्के गाव ई पीक पाणी पूर्ण होऊ दे आणि शेतकरी वर्गाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळू दे आणि दुष्काळ स्थितीतून त्यांना चांगलं बळ प्राप्त होऊ दे असे साकडे घातले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख ग्रामस्थ रमेश दाजी सावंत व रमेश विष्णू सावंत, अनिल सावंत, अनिल हरी सावंत, पांडुरंग सावंत, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, ॲड संतोष सावंत, वेर्ले तलाठी श्री फाले, ज्येष्ठ ग्रामस्थ शिवाजी सावंत, दीनानाथ सावंत माजी सरपंच अनंत सावंत, बाळू सावंत, विष्णू सावंत सखाराम सावंत, सुनील सावंत, सुरेश उर्फ आबा सावंत, दीपक सावंत, कमलाकर सावंत, महादेव सावंत, विराज सावंत, स्वप्निल सावंत, पराग सावंत, प्रमोद नाईक आधी उपस्थित होते, यावेळी तहसीलदार श्री पाटील यांनी सध्याच्या दुष्काळ स्थितीत प्रत्येक ओहोळामध्ये छोटे छोटे बंधारे उभे करा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या. असे स्पष्ट केले .यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या व अडचणी मांडल्या.
