स्टोरी

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा प्रामाणिकपणा…! रस्त्यामध्ये मिळालेला मोबाईल मूळ मालकाला परत.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा येथील वयोवृद्ध ग्रामस्थ मोहन परब यांचा रस्त्यामध्ये पडलेला मोबाईल मसुरे येथील दैनिक तरुण भारतचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना मसरे बाजारपेठ येथील रस्त्यावर सोमवारी पडलेला मिळाला होता. मिळालेल्या मोबाईल मूळ मालकाचा शोध घेऊन दत्तप्रसाद पेडणेकर यांनी प्रामाणिकपणे सदर मोबाईल मोहन परब यांच्याकडे बुधवारी सकाळी सुपूर्द केला. सध्याच्या जमान्यामध्ये प्रामाणिकपणा विरळ होत असताना पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा मसुरे गावामध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे. मोहन परब यांची परिस्थिती अतिशय बेताचीच असल्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्यामुळे मोहन परब यांना अत्यंत आनंद झाला. मोबाईल पाहता क्षणी मोहन परब यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. मोबाईल चेवयोवृद्ध मालक मोहन परब यांनी दत्तप्रसाद पेडणेकर यांना मनःपूर्वक आभार व्यक्त करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

श्री दत्तप्रसाद पेडणेकर ( तरुण भारत – प्रतिनिधी मालवण)

Spread the love

Related posts

पळसंब येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव…!

news

कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार…..!

news

उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या ५१ सहस्र ८०० गुन्ह्यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध !

news

Leave a Comment