स्टोरी

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून जानवली येथे स्वागत.

Spread the love

सिंधुदुर्ग: कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून दोन दिवसीय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांचे जानवली येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत त्या आज आणि उद्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणार आहेत. यामध्ये मतदान केंद्रांवर भेटी, मतदार नोंदणी कार्यालय आढावा, प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचा आढावा तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचेशी संवाद साधणार आहेत. जानवली येथे विभागीय आयुक्त श्रीमती अगरवाल यांनी २६८ कणकवली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या ११३९ मतदार असलेल्या मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, मतदार नोंदणी व विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया अचूक व प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक सूचना केल्या. यावेळी जानवली ग्रामपंचायत सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे उपस्थित होते. त्यानंतर कलमठ ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या योजनांची माहिती घेत उपस्थित पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच संदीप मेस्त्री यांनी स्वागत करून कामांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजने अंतर्गत घरकुल प्रकल्पास भेट दिली. विशेष म्हणजे या घरकुल प्रकल्पाला ग्रामपंचायतीने ‘पंडीत दीनदयाळ संकुल’ असे नाव दिले आहे. या संकुलाची पाहणी करून त्यांनी सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कणकवली उप विभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह महसूल व निवडणूक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

वन विभागच्या चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

news

विवाहित स्त्री पुरुष पण एन्जॉय करू शकतात रिलेशन शिप! मिनाक्षी जगदाळे.

news

प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात संपूर्ण इमारतीच्याच वैद्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता!

news

Leave a Comment