स्टोरी

मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा.

Spread the love

मालवण: मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता १० वी व १२ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात मराठा समाजबांधव व महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.हा गुणगौरव कार्यक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत मालवण येथील नमता मंगल कार्यालय, वाडा–हडपीवाडी, कळा कमल रोड येथे होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अरुण भोगले राहणार आहेत. उद्घाटक म्हणून श्रीकृष्ण ऊर्फ दीपक परब, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास सावंत उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थितीत मंडळाचे उपाध्यक्ष अशोक सावंत, सचिव आशिष परब, उपाध्यक्ष बाबा परब आणि खजिनदार सुधीर धुरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे निमंत्रक सर्व कार्यकारिणी मंडळ व मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाचे सर्व सदस्य आहेत.


Spread the love

Related posts

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त आयोजित रानभाज्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा..! ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव

news

सावंतवाडी शहरातील तीर्थक्षेत्र आत्मेश्वर जलकुंडाची पाण्याची पातळी घटली!

news

Leave a Comment