स्टोरी

कै. प्रतिभा प्रमोद नाईक रेडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रेडकर कुटुंबीयांच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूंचे वाटप.

Spread the love

सावंतवाडी: समाजामध्ये सामाजिक जाणीव असलेल्या दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी संस्थेला नवीन रुग्णवाहिका दिली जी आज रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब रुग्णांना त्यांच्या आजारपणामध्ये रुग्णपयोगी वस्तू उपलब्ध होण्यासाठी सदर दानशूर व्यक्ती सामाजिक बांधिल प्रतिष्ठानला समाजसेवेचा एक केंद्रबिंदू समजून अशा वस्तू दान करत आहेत. याही अगोदर दानशूर व्यक्तींनी संस्थेला रुग्णपयोगी वस्तू दिल्या होत्या तर आज संस्थेच्या निरंतर चाललेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती चित्तरंजन नाईक रेडकर व देवेंद्र नाईक रेडकर यांनी त्यांची आई कै.प्रतिभा प्रमोद रेडकर नाईक यांच्या स्मरणार्थ fowler bed व त्यावरील गादी तसेच , व्हीलचेअर कमोड चेअर, वॉकर अशा रुग्णपयोग्य वस्तू संस्थेला दान केल्या त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी नाईक रेडकर कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी सदर रुग्णपयोगी वस्तू स्वीकारताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी कोरड घशाला पडत आहे.

news

देवस्थान समित्यांच्या समस्यांसह मागण्यांबाबत कार्यवाही…! श्री तेली

news

मालवण येथे ‘राजकोट’ किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे आज भूमीपूजन

news

Leave a Comment