स्टोरी

शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींशी सविस्तर चर्चा.

Spread the love

दिल्ली (म. ल. देसाई)✍🏻: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात दिलेल्या निर्णयामुळे देशभरातील शिक्षकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सेवा संरक्षणासाठी सध्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची ही भेट घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा: TET सक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत यावेळी गर्दी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांवर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सेवांना योग्य संरक्षण मिळेल यासाठी केंद्र सरकारने पर्यायाने संसदेने सकारात्मक पाऊल उचलावे. यासाठी देशातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज गुर्रीकर, वरीष्ठ उपाध्यक्ष हरिगोविंदम, कार्याध्यक्ष विनोद ठकरान, सीमा माथुर, दिल्ली सरचिटणीस नवीन सगवान, हरीयाणा अध्यक्ष तरुण सुहाग आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

वस्त्रहरणचा ‘गोप्या’ लवराज कांबळी यांचे निधन.

news

सिंधुदुर्गात पहिलाच “AaGaaz Fashion Runway 2026” जल्लोषात..!

प्रसाद परब

त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते…! देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका.

news

Leave a Comment