स्टोरी

मसुरे–विरण रस्त्याची दुर्दशा ; पोलीस पाटील शशांक ठाकूर यांनी दिले अभियंत्याना निवेदन.

Spread the love

मालवण प्रतिनिधी: प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत काम चालू असलेल्या मसुरे – डांगमोडे – बेलाचीवाडी – विरण रस्ता कामाबाबत वाडी डांगमोडे पोलीस पाटील शशांक ठाकूर यानी ग्रामस्थांच्या वतीने अभियंता गणेश भिलवडकर यांना निवेदन देत ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये अशी मागणी केली. सदर रस्त्याचे काम गेल्या दीर्घ कालावधीपासून संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण मोरी कामे आणि नागरिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.रस्त्याचे उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने व तात्काळ पूर्ण करावे, तसेच संबंधित त्रुटींची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. पाऊस पडल्यामुळे सदर रस्त्याने चालणे मुश्किल झाले होते तसेच गाडी चालवणे देखील मुश्किल झाले आहे. अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्टरशी संवाद साधला. उद्या दिवसभरात पूर्ण रस्त्यावर ग्रीट पसरून गाडी रुतणार नाही असा रस्ता करून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी वाडी डांगमोडे येथील ग्रामस्थ स्वप्निल ठाकूर, निलेश ठाकूर, महादेव ठाकूर, सुभाष ठाकूर, भाऊ ठाकूर, विश्राम ठाकूर,उमाकांत ठाकूर, गंगाराम ठाकूर,अमित ठाकूर, सत्यवान ठाकूर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीचा भयंकर स्फोट!

news

एस. आर. दळवी फाउंडेशनने आपल्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन….!

news

माऊलींचा वैभवशाली पालखी सोहळा!

news

Leave a Comment