स्टोरीशिक्षण

न्यू होरायझन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ; उन्हात-पावसात फुटपाथवर रांगा

Spread the love

पनवेल | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : न्यू होरायझन शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकाळी भर उन्हात आणि पावसात फुटपाथवर उभे राहून रांगेत तिष्ठत थांबावे लागत आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुरेशी छायांकित जागा किंवा प्रतीक्षागृह नसल्यामुळे लहान मुलांना वाहतुकीच्या धोक्यासह उन्हाचा कडक ताप आणि पावसाचा त्रास सहन करावा लागतो.या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर थेट परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. अनेक विद्यार्थी थकवा, डिहायड्रेशन आणि आजारांना बळी पडत असल्याचे सांगितले जाते. मात्र शालेय प्रशासन या मूलभूत समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकही याकडे कानाडोळा करत आहेत.पालकांनी तातडीने योग्य शेड, प्रतीक्षागृह किंवा सुरक्षित वेटिंग एरिया उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नसल्याचे स्पष्ट करत, संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

बिळवसच्या महिला देश पातळीवर चमकाव्यात! सरपंच मानसी पालव. बिळवस मध्ये कर्तुत्ववान महिलांचा सन्मान..

news

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

news

जेष्ठ क्रीडा संघटक श्री अशोक दाभोलकर-मेस्त्री व शशिकांत गवंडे ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने सन्मानित

news

Leave a Comment