Uncategorized

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे उद्या शिवसेनेचे आंदोलन.

Spread the love

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला १२ लाखाचा दंड

 

 

सिंधुदुर्ग: शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उद्या मंगळवार दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

आज कालावल हुरासवाडी येथे ‘महाशिवरात्री’ उत्सवाचे आयोजन!

प्रसाद परब

प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ डेगवे -बांदा येथे “रामनवमी उत्सवाचे” आयोजन!

news

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी! नितीन गडकरी…

news

Leave a Comment