स्टोरी

मिलाग्रीस हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: मिलाग्रीस हायस्कूल मध्ये दिनांक २२ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुजनांचा विशेष सत्कार व कौतुक करण्यात आला. विद्यार्थ्या मार्फत प्रत्येक वर्ग शिक्षकांना पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. तसेच शिक्षकांसाठी खास भेटवस्तू व भाषण यांचेही आयोजन केले गेले प्रत्येक वर्गाद्वारे केले गेले.  या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधक सिद्धी नाईक या विद्यार्थिनीने आपल्या भाषणामध्ये गुरू प्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले. कुमारी आर्या हिने हे आपल्या भाषणांमध्ये गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान विशद केले. याप्रसंगी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत सदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेतील उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल व सहाय्यक शिक्षक श्री दत्ताराम नाईक सर यांनाही शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली गेली.

अत्यंत सुंदर आणि रम्य अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ताराम नाईक सर यांनी केले. तसेच सिस्टम मेबल पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत बंदीवानांना करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान बाबत मार्गदर्शन.

news

एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे साजरा होणार श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन.

परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तिमय. 

news

Leave a Comment