स्टोरी

मेट्रो ट्रेनचा कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार

Spread the love

मुंबई : भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ या मार्गिकेचा विस्तार आता उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत हा विस्तार करण्याचा मोठा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. कल्याण ते खडकपाडा आणि खडकपाडा ते कल्याण असा ७.७ किलोमीटरचा विस्तारी मार्ग हा दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे. उल्हासनगरपर्यंत ‘मेट्रो ५’च्या विस्तारासाठी बृहत आराखडा तयार करण्यासाठी MMRDA ला सल्लागार समितीची नियुक्ती करावी लागणार आहे. आणि या संबंधिचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या आगामी बैठीकत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.मुंबई उपनगरी लोकल ट्रेनवरील वाढता ताण, प्रवाशांची वाढती संख्या आणि वाहतूककोडींची समस्या पाहता मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये MMRDA कडून मेट्रोचा विस्तार यहोत आहे. यानुसार एमएमआरडीएकडून मेट्रोच्या अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. एमएमआरडीएकडून ३३७ किम लांबीचे मेट्रो मार्गाचे काम करण्यात येत असून त्यात ‘मेट्रो ५’ प्रकल्प येतो. ‘मेट्रो ५’ हा प्रकल्प २४.९ किलोमीटर लांबीचा असून यासाठी ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


Spread the love

Related posts

निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

news

माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार?

news

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून मंगलराघोनगर प्रभागात नागरी विकास कामांचा शुभारंभ!

news

Leave a Comment