स्टोरी

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत या कुटुंबियांना पाठवून दिली. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सदर तातडीची आर्थिक मदत मसुरे कावावाडी येथे येत किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांच्या जवळ दिली. भारतीय जनता पक्ष व भाजप नेते डॉ. निलेश राणे तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी या कुटुंबियांना दिला. यावेळी संतोष गावकर, देवेंद्र हडकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, सचिन पाटकर, यशवंत हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर आदी उपस्थित होते. तातडीच्या मदती बद्दल किरण पाटील तसेच इतर आपत्तीग्रस्तांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी विलवडेच्या सुपुत्राचे सहकाऱ्यांसह एमपीएससी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू.

प्रसाद परब

कलंबिस्त येथे आयोजित रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी मध्ये १०० हून अधिक जणांनी घेतला सहभाग

news

पावसाची प्रतीक्षा संपली!

news

Leave a Comment