स्टोरी

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे! डॉ. प्रशांत ससाणे

Spread the love

सावंतवाडी: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासह एकूण १४ विभागामार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन गोवा धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ. प्रशांत ससाणे यानी केले.

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, असनिये ग्रामपंचायत आणि शिवतेज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने असनिये प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ प्रशांत ससाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असनिये सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच साक्षी सावंत, माजी सैनिक पांडुरंग धुरी, गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ योगेश शिंदे, डॉ थ्रीजिल के, डॉ सायली कासार, डॉ अपर्णा सिद्धे, माजी सरपंच एम डी सावंत, पोलीस पाटील विनायक कोळापटे, ग्रामसेवक मुकुंद परब, शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिनेश सावंत, सचिव प्रशांत ठिकार, समीर कोलते, शरद सावंत, संजय सावंत, आनंद सावंत, सचिन कोलते, अखिल भारतीय संस्थानचे सुमा नाईक, शांती सावंत, गिरीश नाईक, रजत नाईक, प्रमोद सावंत, सागर धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी मुकुंद परब यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे शाश्वत उपचार असुन सर्वांसाठी एक देणगीच आहे. त्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह राबवित असलेले आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

  या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन असनिये ग्रामपंचायत, आणि शिवतेज मित्रमंडळ यांनी केले होते. त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त लाभला. असनिये प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात असनिये सारख्या ग्रामीण गावातील १६५ रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर कोलते, सूत्रसंचालन प्रितेश ठिकार यांनी तर आभार ग्रामसेवक मुकुंद परब यांनी मानले.


Spread the love

Related posts

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘एकात्म मानवदर्शन’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.

news

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने ‘एक दिवा सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

news

ISRO द्वारे चांद्रयान-३ मोहिमेची तयारी पूर्ण!

news

Leave a Comment