स्टोरी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली.

या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्रा रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात सर्व बंदीवानांसह अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांना धनुर्वाताची लसही देण्यात आली. तसेच ब्लड शुगरचीही तपासणी करण्यात आली.

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कारागृहात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तर तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृह आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, गुरुनाथ राऊळ, भगवान रेडकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले. तर कारागृह कर्मचारी सुभेदार श्री शेट्ये, श्री गुरव, हवालदार नरेंद्र चव्हाण, रतनसिंग सोळंके, कारागृह कर्मचारी गीतांजली नाईक, सागर सपाटे यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट!

news

पंढरपूर वारीला भीषण अपघाताचे ग्रहण..! अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू.

प्रसाद परब

“RWG TRADING PVT. LTD.”चा ६ वा वर्धापनदिन सोहळा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कुडाळ येथे होणार..

news

Leave a Comment