राजकारण

अशोक चव्हाण यांनी दिला आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा…!

Spread the love

१२ फेब्रुवारी वार्ता: अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यासह इतरही काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यापैकी अमर राजूरकर यांनी आजच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या सोबत पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्यांमध्ये सांगलीतील आमदार विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, माधव जवळकर, अमित झनक, मुंबईतील अस्लम शेख व अमीन पटेल यांची नावे आहेत. हे सगळे आमदार कोणत्याही क्षणी राजीनामा देतील. माजी आमदार हुनमंत बेटमोगरेकर आणि रमेश बागवे हे देखील चव्हाणांना साथ देतील. दरम्यान चव्हाण यांच्यासह सात ते आठ आमदार पक्षातून गेल्यास काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


Spread the love

Related posts

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू याच्या अटके नंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक!

news

विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांची उबाठा शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका पदी निवड.

news

अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे; विरोधी पक्ष आक्रमक, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान….

news

Leave a Comment