स्टोरी

कुवेतच्या शासकाचे निधन…!

Spread the love

१७ डिसेंबर वार्ता: कुवेतचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे काल शनिवारी १६ डिसेंबर २०२३ रोजी  निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने आज रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. या दिवशी संपूर्ण भारतात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच, या दिवशी मनोरंजनाचे कोणतेही अधिकृत शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि जनतेप्रति संवेदना व्यक्त केली. पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले: “महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त जाणून अतिशय दु:ख झाले. कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि तेथील जनतेप्रति मनापासून शोक भाव व्यक्त करतो.” असं पंतप्रध नरेंद्र मोदी म्हणाले.


Spread the love

Related posts

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित

news

‘भारत’ नाव करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ! संयुक्त राष्ट्रे

news

जिल्ह्यात १०३ जोखीमग्रस्त गावे: आरोग्य यंत्रणा सतर्क! साथ नियंत्रण अधिकारी डॉ. संदेश कांबळे.

news

Leave a Comment