स्टोरी

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात…!

Spread the love

४ डिसेंबर वार्ता: आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.  आज सकाळी १०:३०  वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडाव यासाठी संबोधित करणार आहेत. हिवाळी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे.  संसदेच्या १९ दिवसांच्या या अधिवेशनात १५ बैठका होणार असून ३७ विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CRPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Spread the love

Related posts

गोळवण मध्ये बंद घरास लागली आग!

news

कलंबिस्त येथे आयोजित रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी मध्ये १०० हून अधिक जणांनी घेतला सहभाग

news

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ.

news

Leave a Comment