स्टोरी

मसुरेत काल रद्द झालेली खुली ग्रुप डान्स आणि एकेरी नृत्य स्पर्धा आज ८ नोव्हेंबर रोजी मसुरेत रात्री ७ वाजता होणार.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणारी स्पर्धा पावसामुळे अचानक काल रात्री रद्द करण्यात आलेली होती. रद्द झालेली ही स्पर्धा दिनांक आज बुधवार 8 नोव्हेंबर रोजी पुन्हा संध्याकाळी ठीक सात वाजता मसुरे येथे डॉ साठे यांच्या निवासस्थाना नजीक घेण्यात येणार आहे. आणि जर पुन्हा पावसाचे वातावरण असल्यास ही स्पर्धा आर.पी बागवे हायस्कूलच्या बंदिस्त सभागृहात घेण्यात येईल. काहीही करून या स्पर्धा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

याची सर्व स्पर्धकांनी, ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन या संस्थेच्या वतीने डॉक्टर विश्वास साठे यांनी केले आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि भाग्यवान पैठणी विजेत्यांची नावे आणि पैठणीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

हिमालयामध्ये आजही आढळते संजीवनी!

news

रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘चक्रीवादळ आपत्ती निवारण’ रंगीत तालीम

news

सावंतवाडी बांदा रोड गरड येथे झाडावर लटकणारी धोकादायक फांदी न तोडल्यास त्याचं झाडाखाली बसून आंदोलन करणार..! रवी जाधव

प्रसाद परब

Leave a Comment