स्टोरी

मंगल कामत यांची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण सदस्य पदी निवड.

Spread the love

सावंतवाडी: बांदा तालुक्यातील कास येथील रहिवासी तसेच सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगल शांताराम कामत यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे. तसे निवडीचे पत्र त्यांना राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिले आहे. मंगल कामत यांची यापूर्वीही महिलांच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरेत विकास कामांचा धडाका…!

news

देवस्थान जमिनी हडपल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी! मंदिर महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

news

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी दीपा ताटे तर उपाध्यक्षपदी नेहा कोळंबकर 

news

Leave a Comment