स्टोरी

नांदेड येथे बस पेटवल्‍याने अंतर्गत बससेवा बंद !

Spread the love

नांदेड: मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याच्‍या मागणीसाठी येथे तीव्र स्‍वरूपात आंदोलन केले जात आहे. येथे एक एस्.टी. बस जाळण्‍यात आली असून दुसर्‍या बसवर दगडफेक करण्‍यात आली. या घटना मागील २ दिवसांतील असल्‍याने १४ सप्‍टेंबर या दिवशी नांदेड जिल्‍ह्यात जिल्‍हाअंतर्गत एस्.टी. बस सेवा सकाळपासून बंद ठेवण्‍यात आली. इतर आगार आणि विभाग येथून ज्‍या गाड्या रात्री मुक्‍कामी आल्‍या होत्‍या, त्‍यांना सकाळी सोडण्‍यात आले आहे. अचानक घेतलेल्‍या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल झाले. बस जाळल्‍याप्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. *नागपूर-धुळे बसने अचानक पेट घेतला !* *चालकाच्‍या प्रसंगावधानाने १६ प्रवासी बचावले !*नागपूर – जिल्‍ह्यातील कोंढाळी बसस्‍थानकाजवळ ‘एस्.टी.’ला आग लागली. सुदैवाने वेळीच चालक आणि वाहक यांनी आग विझवल्‍याने मोठी दुर्घटना टळली आहे. ही एस्.टी. नागपूर मध्‍यवर्ती बसस्‍थानकावरून पहाटे ५.३० वाजता १६ प्रवाशांना घेऊन धुळे येथे जात होती. कोंढाळी बसस्‍थानकावर ७.३० वाजता एस्.टी. आल्‍यानंतर तिच्‍या इंजिनमधून धूर निघून इंजिनने पेट घेतला. ही गोष्‍ट चालकाच्‍या लक्षात येताच त्‍याने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. अग्‍नीशमनदलाने आग विझवली.


Spread the love

Related posts

सावंतवाडी नवसरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

आयपीएस अधिकारी अभिनव कुमार यांचं आर्यन खान यांना पत्र…..

news

फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा..! रवी जाधव 

news

Leave a Comment