स्टोरी

सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – दीपक केसरकर

Spread the love

कोल्हापूर:  कोल्हापूर – पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. स्मारकासाठी १ कोटी रुपये आणि अंतर्गत रस्त्यांसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. ते पेठवडगाव येथे नगर परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या प्रसंगी शिवसेना खासदार धैर्यशील माने, तहसीलदार कल्पना ढवळे यांसह अन्य उपस्थित होते.

 

माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांनी ‘महालक्ष्मी तलावात जाणारे पाणी नागरिकीकरण आणि औद्योगिकरण यांमुळे दूषित होणार आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने यासाठी उपाययोजना करावी’, अशी सूचना केली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, प्रविता सालपे, अजय थोरात यांसह अन्य उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आर्किटेक्ट सौ.समिता पियुष सावंत हिने आपला वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यान समवेत साजरा करून भेटवस्तू दिल्या.

news

कोमसाप सावंतवाडी शाखेचा ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

news

हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती.

प्रसाद परब

Leave a Comment