स्टोरी

मसुरेच्या श्री दत्त मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ अंतर्गत होणार विकास!

Spread the love

संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी वेधले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष….

 

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे देऊळवाडा येथील जागृत देवस्थान समर्थ बागवे महाराज संस्थानच्या श्री दत्त मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ अंतर्गत विकास होण्यासाठी संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी आंगणेवाडी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. समर्थ बागवे महाराज संस्थान दत्त मंदिर येथे भक्त निवास व मंदिर सुशोभीकरण मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकुर, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, काका आंगणे व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मसूरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंतीउत्सव साजरा होणार..!

news

कल्याण-शीळ रोड : ‘विकास की नियोजनशून्यता?’ भूमिपुत्र धर्माभिमानी संघाचा प्रशासनाला खडा सवाल

प्रसाद परब

गिर्ये येथे संविधान दिन साजरा.

news

Leave a Comment