स्टोरी

जालना लाठीचार्जचा प्रकरणाचा सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने निषेध!

Spread the love

सावंतवाडी: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने इन्सुली येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

यावेळी मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यश सीताराम गावडे, बांदा अध्यक्ष बाळू सावंत, इन्सुली अध्यक्ष नितीन राऊळ, दिनेश मुळीक, प्रथमेश सावंत, आनाजी देसाई, आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बांदा पोलीस उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कट्टा येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!

news

आ. वैभव नाईक यांच्या वतीने मालवणमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ

news

गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

news

Leave a Comment