स्टोरी

नाशिकमध्ये आई – वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

Spread the love

 

 

नाशिक:– आई – वडीलांना न सांभाळणार्‍या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली.

 

यावेळी जानोरी गावात आई-वडीलांचा सांभाळ न करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ न देण्याचाही ठराव एकमताने संमत करण्यात आला.यावेळी तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारीका केंग, विश्‍वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, कैलास पगारे ज्ञानेश्‍वर विधाते, भारत काठे, दिपक काठे, काळू तुंबडे, रमेश जाधव, नाना डंबाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण ? योगेश धुरी

news

नवी मुंबईकरांचे पाणी चोरून देवद-विंचुंबे ग्रामपंचायतींची मनमानी? कारवाईस प्रशासन का घाबरते? – मनसेचा सवाल

प्रसाद परब

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

news

Leave a Comment